जुने मित्र

“जुने मित्र आता हरवलेत
कोणी खुप busy झाले
तर कोणी खुप भाव खाऊ लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

वेळ पाहुन आता भेटु लागले
भेटुनही काही मित्र आता
घड्याळात पाहु लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

कोणी मोजकेच बोलु लागलेत
तर कोणी काय बोलावं ते म्हणु लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

कोणी success बद्दल बोलु लागलेत
तर कोणी स्वतःचच गुणगान गाऊ लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

कोणी माझ तुझ करु लागलेत
तर कोणी उगाच तिरस्कार करु लागलेत
कधी जुन्या भांडणाचे आता
उगाच राग धरू लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

सगळं share करणारे मित्र आता
उगाच खोट बोलु लागलेत
मित्रा सोबत दुखः वाटणारे
उगाच खोटी प्रतिष्ठा जपु लागलेत

खरंच जुने मित्र आता पुन्हा
आठवणीत येऊ लागलेत
एक कप चहासाठी
पुन्हा कट्टयावर भेटु लागलेत
वेळ न पहाता अवेळी येऊ लागलेत
मनातल्या जुन्या आठवणी
पुन्हा share करु लागलेत!!”

-योगेश खजानदार

9 comments

Leave a Reply