क्षणांत

 आयुष्यात जगताना आपण विसरुन जातो आपल्याच लोकांना.. पण जेव्हा आयुष्याची संध्याकाळ होते तेव्हा त्याच लोकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एक कविता ..


‘क्षणांत .!’

“आयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना
नाही म्हटलंच तरी आठवणींत या
कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला
आयुष्यभर डावलेल्या नात्यात का
हाक देतो पुन्हा पुन्हा बोलायला
मी आणि माझे आयुष्य म्हणताना
का विसरलो आपुलकीच्या मित्रांना
पुन्हा नव्याने ओळख करण्यास का
दिसली आठवण ती सावल्यांना
हळुवार निघुन जाताना हे जीवन
विसरलोच मी स्वतःला ओळखायला
कळले जेव्हा सारे हे ज्या वेळी
सुर्यास्त झाला का या जीवनाचा
पण मनात होती एक आस पुन्हा
सुंदर असावा क्षण अखेरचा
जणु रम्य सांजवेळीचा तो प्रवास..!”

-योगेश खजानदार​


One comment

Leave a Reply