Skip to main content

मनातली कविता

“एक आर्त हाक मनाची
पुन्हा तुला बोलण्याची
तुझ्यासवे सखे मनातील
खुप काही ऐकण्याची

तुझ्याचसाठी पावसाची
ढगाळल्या नभाची
तु नसताना समोर आज ती
बेधुंद होऊन बरसण्याची

क्षणात या जगण्याची
वेडी आस तुला शोधण्याची
हरवुन जाता वार्‍यासवे
पुन्हा तुला पहाण्याची

कशी सावरावी ओढ नजरेची
आठवणीत तुझ्या राहण्याची
ह्रदयात माझ्यासवे आज तु
खुप काही सांगण्याची

अबोल या नात्याची
वेडावल्या या सरींची
तुझ्याचसाठी शब्दांसवे ती
चिंब भिजून जाण्याची

एक आर्त हाक मनाची
पुन्हा तुला बोलण्याची.. !!”

-योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply