Skip to main content

अस्तित्व

कविता थोडी वेगळी .. प्रत्येक स्त्रीची .. तिच्या अस्तित्वाची  

स्त्रीला दातृत्व आहे!!

स्त्रीला मातृत्व आहे!!

स्त्रीत क्षमता आहे!!

स्त्रीत ताकद आहे!!

तरीही ती लढतेय आपली अस्तित्वाची लढाई .. आपल स्त्रीत्व  विसरुन जगतेय ती आपल्या स्वतःचीच लढाई .. एक कविता …


‘अस्तित्व …!!’


“स्वतःच अस्तित्व शोधताना
मी कुठेतरी हरवुन जाते
समाज, रुढी, परंपरा यात आता
पुरती मी बुडून जाते


कोणाला मी हवीये 
तर कोणासाठी बोज होऊन जाते
एक स्त्री म्हणून जगताना
आज खरंच मी स्वतःस पहाते


माझेच मीपण सोडुन मी
तुझे पुरुषत्व जपत राहते
कधी खंत मनाची तर
कधी स्वतःस सावरून जाते


कधी घोटला गळा माझा
पोटातच मला मारले जाते
कधी समाज लाजेचे रोज
कितीतरी बलात्कार होत राहते


तरीही धडपड माझी आज
तुझ्यासवे मी चालत जाते
स्त्री म्हणुन जगताना मी
नेहमीच तुझी साथ देत राहते


स्वतःच अस्तित्व शोधताना
खरंच मी हरवुन जाते..!!”

-योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply