विरहं

“ठरवुन अस काही होतंच नाही
मनातलेच मन कधी ऐकत नाही
नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला
रोजच भेटल्या शिवाय रहातं नाही

आसवांनाही कधी निटस विचारत नाही
कित्येक दुख डोळ्यातुन वाहत नाही
पापण्यांचा दोष हा सारा जणु की
अश्रुं मधुनही तिला जाऊ देत नाही

किती हा एकटा प्रवास की अंत नाही
सोबत नसावी तिची हे ह्रदय मानत नाही
वाट अशी चालताना आज मझ
स्वतःस हरवुन गेलेलेच माहित नाही

शोधूनही कधी ती सापडत का नाही
बदलले क्षण तरी ओढ का जात नाही
ह्रदयातल्या कोपर्‍यात तिच असताना
आज मला ती काहीच का बोलत नाही

सरले पान ते पलटलेच नाही
काय लिहिले ते नीट वाचलेच नाही
अखेरच्या ओळीतले शब्द असे की
पाहुनही ते मी पाहिलेच नाही!!”


-योगेश खजानदार

Leave a Reply