मला माहितेय

“खुप बोलावंसं वाटतं तुला
पण मला माहितेय आता
तु मला, बोलणार नाहीस!!

सतत डोळे शोधतात तुला
पहाण्यास एकदा आता
नजरेस तु पुन्हा, दिसणार नाहीस!!

कधी भेटशील मझला तु
वाट बघते ते वळण आता
पण मला माहितेय, तु येणार नाहीस!

साथ या मनास एक तु
साद घालते तुलाच आता
पण मला माहितेय ,तुला कळणार नाही!!

हे वेड की प्रेम माझे तु
शब्द ही भांबावले ते आता
पण मला माहितेय ,तुझ्या ह्रदयास ते कळणार नाही!!

खुप बोलावंसं वाटत तुला
पण तु बोलणार नाहीस!!”


-योगेश खजानदार

Leave a Reply