मन आणि मी

सतत काहीतरी लिहावं आणि ते सर्वानी वाचावं. एवढच असत का ते??.. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द हेच साधन आहे का?.. मन का सारख काहीतरी विचार करतं.. आणि काहीच न सापडल्यावर उदास होऊन गप्प बसतं.. असंख्य विचारांच हे वादळ आता का कुठे थांबत नाही? ?. की विचार करुच नये आणि त्यावेळी मनाने अजुन असंख्य विचाराच गाठोडं समोर उघडून बसावं.. काहीच कळेनासं झालंय.. मनातल्या कोपर्‍यात कोणीतरी सतत का आठवावं .. विसरुन जावं त्यास म्हटलं तरी त्याने पुन्हा पुन्हा समोर का यावं … असा गोंधळ झालाय सगळा म्हटलं तरी मन कोणाची तरी खुप आठवणं काढतंय अस सांगावं.. की सांगुच नये कोणास.. मग मनाच वादळ थांबेल तरी कस .. असा प्रश्न येतो.. मी आणि माझ मन म्हटलं तरी हे तिसर कोण येतं आमच्या मध्ये… आमच्या गप्पा मध्ये ही तिसरी कोण जिचा विषय हे मन सारखं काढतंय.. . गप्प बस रे मना.. म्हटलं तर त्याने पुन्हा पुन्हा तेच बोलावं.. समोरची व्यक्ती गप्प बसतवता येते.. पण या मनाच काय करावं.. फक्त आठवणं.. पण असं म्हणतात की आपल्याला ज्या व्यक्तीची आठवणं सारखी येते ती व्यक्तीही आपली तेवढीच आठवणं काढत असते.. खरंच अस असत का ??.. की फक्त मनाचे खेळ सगळे हे.. नकोच तो विचार पुन्हा आता.. नको रे मना .. तुलाही सहन होतं नाही आणि मलाही.. जाऊ दे तो विषय .. मग मन बंड करून उठावं.. हातात लेखणी घेऊन स्वतःस पानांवर उतरावं. . तरीही शांत झालं तर ठीक हे मन नाहीतरी पुन्हा मला छळत रहावं.. खरंच मनाचा ठाव शोधता येईल का??.. ..


-योगेश खजानदार…

Leave a Reply