भावना….

“कधी हळुवार यावी
कधी वादळा सारखी यावी
प्रेमाची ही लाट आता
सतत मनात का असावी?

तु सोबत यावी
ऐवढीच ओढ लागावी
मनातल्या भावनांची जणु
नाव किनारी का जावी?

समोर तु असावी
सतत ह्रदयात रहावी
चेहरा तुझा पहाण्यास
नजरेने धडपड का करावी?

साथ तुझी अशी असावी
भेट तुझी रोज व्हावी
वाट तुझी चालताना
वेळ अनावर का व्हावी?

मला माझी शुद्ध नसावी
तुझीच आठवण रहावी
स्वतःस ही शोधताना
तुच मझ का सापडावी?

हे प्रेम की भावना असावी
तुझ्यासवे आयुष्यभर रहावी
सुटताच येऊ नये अशा बंधनात
मला कायमची का अडकावी?”

-योगेश खजानदार

Leave a Reply