Skip to main content

वहीच्या पानांवर…!!!

“जुन्या वहीच्या पानांवर
आज क्षणांची धुळ आहे
झटकून टाकावी आज
मनात एक आस आहे

कधी भरून गेली ती पाने
आठवणींचे गावं आहे
कालचे ते सोबती मज
पानांवर दिसतं आहे

कोणी दिली साथ खुप
कोणी क्षणिक सोबती आहे
वहिच्या या नायकाची
ही कथा सुंदर आहे

कधी जिंकलो ते क्षण
पराजित ही झालो आहे
मनास नाही कोणती खंत
जगणे याचेच नाव आहे

काही क्षण हसवून ही गेले
ते हास्य ओठांवर आहे
काही क्षण रडवून ही गेले
ते अश्रु पानांवर आहे

जुन्या वहीच्या पानांवर
आज क्षणांची धुळ आहे !!!”

-योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply