एक कळी… !!

“एकदा वेलीवरची कळी
उगाच रुसुन बसली
काही केल्या कळेना
फुगून का ती बसली

बोलत नव्हती कोणाला
पाना मागे लपुन बसली
हसत नव्हती कशाला
अबोल होऊन बसली

सांग तरी काय झाले
का रुसुन बसली
बोलना आता एकदा तरी
कशासाठी फुगुन बसली

काही केल्या बोलेच ना
पंचाईतच होऊन बसली
कशी उमलेल ही कळी
चिंताच होऊन बसली

पाने , कळ्या , वेलीवरची
सगळे मनवुन बसली
काही केल्या हसेच ना
उगाच रडत बसली

वेलीवरची ती कळी
एकटीच जाऊन बसली
पण काही केल्या कळेना
रुसुन का ती बसली … !!”

– योगेश खजानदार

2 thoughts on “एक कळी… !!”

Leave a Reply