किनारा..

“पावलं चालतात त्या समुद्र किनारी
आठवणीत आहे आज कोणी
सुर्य ही अस्तास जाताना
थांबला जरा मझं जवळी

ती लाट पुसते मज काही
आठवण असते तरी काय ही?
मझं सारखे पुन्हा पुन्हा येताना
ओलावते का मन ती

तो बेफान वारा बोलतो काही
आठवण म्हणजे विचारतो काय ती?
मझं सारखे मुक्त फिरताना
जाणवते का मनास ती

ती शुभ्र चांदणी येते आकाशी
सांग म्हणते आठवण काय ती?
मझं सारखे लुकलुकताना
तुटते का अचानक ती

कसे सांगावे काय ती
आठवण असते जाणीव ती
मनातुन चांदणे तुटताना
ओलावते डोळे ती!!”

-योगेश खजानदार

Leave a Reply