खंत… !!

“तो दरवाजा उघडला होता
तीच्या डोळ्यात पाणी होते
आईची खंत काय आहे
ते मन आज बोलतं होते

नकोस सोडुन जावु मजला
मी काय तुला मागितले होते
एक तु,तुझे प्रेम
बाकी काय हवे होते

आयुष्य तुझे घडवताना
मी माझे क्षण वेचले होते
रडणार्‍या तुला मी
कुशीत माझ्या ठेवले होते

आज अश्रु माझे आहेत
ते ही मी लपवले होते
अनाथ म्हणुन मला सोडताना
ते दार तु उघडले होते

शाळेत तु जाताना
येण्याची वाट मी पाहत होते
आज मला तु सोडताना
परतुन यावेस हेच मला वाटत होते

आई आई म्हणारे माझे बाळ
आज कुठे हरवले होते
पळत येऊन मिठी मारणारे
अनाथ मला करुन गेले होते

माझा हात धरुन चालणारे बाळ
तो दरवाजा आज उघडत होते
आणि आईची खंत काय आहे
ते मन स्वतःलाच आज बोलतं होते!!”

– योगेश खजानदार

Leave a Reply