मी पणा .. !!

“माझं माझं करताना
आयुष्य हे असचं जातं
पैसा कमावत शेवटी
नातं ही विसरुन जातं

राहतं काय अखेर
राख ही वाहुन जातं
स्मशानात गर्व ही
आगीत जळून जातं

मी आणि माझं
हे नाव ही विसरुन जातं
कमावलेलं सगळं काही
नात्यान मध्ये वाटुन जातं

सुख माझं असताना
दुख परक करुन जातं
मी पणा करताना
नातं कायमचं तुटुन जातं

शेवट अखेर शुन्य
माझं माझं न राहतं
आयुष्यभर सांभाळलेल
शरीर ही सोडुन जातं!!!”

-योगेश खजानदार

Leave a Reply