हास्य

“खळखळून वाहणाऱ्या नदीत
तुझ हास्य वाहुन जातं
माझ्या मनातल्या समुद्रात
अलगद ते मिळुन जातं

ओलावतात तो किनारा ही
नावं तुझ कोरुन जातं
लाटांच्या या खेळात
कित्येक वेळा पुसुन जातं

पुन्हा पुन्हा लिहिताना
ह्रदयात ते कायम राहतं
वाळु वरच्या क्षणांना
सतत ओलं करत राहतं

एकट्या सांज वेळी
सुर्यासही सोबत राहतं
डोळ्यात तुझ्या आठवणींना
लाटां मध्ये शोधत राहतं

कुठे तु दिसताच
स्वतःस ते हसतं राहतं
आणि मनातल्या समुद्रात
अलगद ते मिळुन जातं!!”

– योगेश खजानदार

Leave a Reply