प्रेम. ….

“म्हणतात तरी अस
प्रेम हे खुप छान असत
छोट्या छोट्या गोष्टीत
ते सतत हव असत

कधी आईच्या मायेत
लपलेल ते असत
कधी प्रेयसीच्या रागात
दडलेल ते असत

पिलांवरच्या मायेनं
घरट्यात ते मिळत असतं
गाईच्या दूधाने तेव्हा
वासरास मिळत असतं

असं म्हणतात तरी कसं
प्रेम हे अबोल असतं
न बोलताही सतत ते
कुठेतरी दिसत असतं

कधी प्रेयसीच्या नजरेतुन
खुप काही बोलत असतं
कधी माथ्यावर कुरवाळत
आईशी बोलत असतं

आणि कधी फांदीवर निवांत
दोन क्षण घालवत असतं
असं म्हणतात तरी कसं
प्रेम हे एकदाच होत असतं

प्रत्येक क्षणात जगताना
ते का नवीन वाटत असतं
कधी प्रेयसीच्या मिठीत
सतत का दिसत असतं

कधी आईच्या कुशीत
पुन्हा पुन्हा का जातं असतं
आणि फांदीवरच्या घरट्यात
नकळत ते ओढ घेतं असतं

खरंच.. म्हणतात तरी अस
प्रेम हे खुप छान असतं… !!”


– योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply