नजरेतूनी बोलताना

“नजरेतूनी बोलताना
तु स्वतःस हरवली होती
ती वेळही अखेर
क्षणासाठी थांबली होती

ती वाट ती सोबत
ती झुळुक ही धुंद होती
तुझे शब्द ऐकण्यास
ती सांज आतुर होती

तु पाहिले मला
माझ्यात तु होती
प्रेम हे तुझे किती
मलाच विचारत होती

स्वतःस प्रश्न करताना
स्वतःच उत्तर शोधत होती
प्रेम माझ्यावर करताना
तु स्वतःस हरवली होतीस!!”

:योगेश खजानदार

Leave a Reply