पुन्हा जगावे क्षण

“पुन्हा जगावे ते क्षण
तुझ्या सवे आज सखे
तु समोर असताना
व्यक्त व्हावे मन जसे

ती सांज तो वारा
पुन्हा ती वाट दिसे
ते नभ ही पाहता
चांदणी ती एकाकी असे

आठवणीत शोधताना
तु आसवात दिसे
चंद्र हा हरवला
मनी का सल असे

शब्दांत तुझ पहाताना
एक भास का दिसे
तु पुन्हा भेटावीस
मन हे अधीर दिसे

पुन्हा जगावे ते क्षण
तुझ्या सवे आज सखे!!”

@योगेश खजानदार

Leave a Reply