आजही तु तशीच आहेस. .

“काळाने खुप पानं बदलली
पण आजही तु तशीच आहेस
खरंच सांगु तुला एक
तु आजही आठवणीत आहेस

एकांतात चहा पिताना
तु माझ्या ओठांवर आहेस
कधी ह्दयात कधी मनात
माझ्या क्षणात आहेस

विसरुन गेलीस तुलाच तु
स्वतःस तु शोधत आहेस
माझ्यात तु शोध तुला
श्वासात मी जपलं आहे

डोळ्यांतुनी पाहताना
ओढ तुझी दिसत आहे
काळाची ही सर्व पाने
तुझ विन व्यर्थच आहेत

शब्दाविना खुप सांगतात
हे अश्रूं मझ बोलत आहेत
काळाने खुप पानं बदलली
पण आजही तु तशीच आहे!!”

✍️योगेश

Leave a Reply