Skip to main content

मी मात्र

“वाटा शोधत होत्या मला
मी मात्र स्वतःतच गुंतलो होतो
बेबंद वार्‍या सोबत
उगाच फिरत बसलो होतो

वळणावर येऊन सखी ती
सोबत येण्यास तयार होती
मी मात्र परक्याच्या घरात
उगाच भांडत बसलो होतो

वेळेनेही वाट पाहिली माझी
वळणावर येऊन थांबली होती
मी मात्र अहंकारा सोबत
उगाच फिरत बसलो होतो

त्या वाटा, ती सखी आज
मला का पुन्हा भेटावी येऊन
मी मात्र स्वतः सोबत
उगाच एकटा राहिलो होतो!!”

✍️ योगेश

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply