Skip to main content

आई

“मायेच घर म्हणजे आई
अंधारातील दिवा म्हणजे आई
किती समजाव या शब्दाला
सार विश्व म्हणजे आई

चुकल ते समजावणारी आई
योग्य मार्ग दाखवणारी आई
आपल्या ध्येयाकडे चालताना
खंबीरपणे बरोबर उभी ती आई

कधी रागावणारी ती आई
प्रेमान जवळ घेणारी ती आई
संस्कारांना घडवताना
कठोर होणारी ती आई

आपली काळजी करणारी आई
आपली वाट पाहणारी आई
काळीज जिचं आपल्याच साठी
ह्रदयात रहाणारी ती आई!!”

✍️ योगेश

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply