उठावं

“अस्तित्वाच्या जाणिवेने
लाचार जगन का पत्कराव
स्वाभिमानाने ही तेव्हा
स्वतःही का मरावं
नसेल त्यास होकार मनाचा
मग शांत का बसावं
निर्दयी या दुनियेत
दया मागुन का रहावं
झुगारून द्याव अन्यायाला
ते ओझं किती पेलावं
नसेल लक्ष विधात्याचं
मग कोणाला सांगावं
की पेटुन द्यावं हे सगळं
क्षणात सगळं राख करावं
वाईट विचारांच्या ताकदीला
क्षणात धुळीत मिळवावं
संपवुन त्या लाचार आठवणी
पुन्हा मनसोक्त जगावं…!!”

✍️ योगेश

Leave a Reply