वचन

“ऐक ना एकदा मन हे बोलती
हरवली सांज ही सुर का छेडली
नभात ही चांदणी पुन्हा का पाहुणी
चंद्रास ओढ का तुज पाहता क्षणी
उतरुन ये या गोड स्वप्नातुनी
मिठीत घे मझ एक आस ती
रात्रीस मग नको हा अंतही
तुझ्यात मी माझ्यात तु विसरुनी
तुला मी पहावे या डोळ्यांतुनी
मनात ही भरावे तुझे सौदर्यही
पुन्हा ह्रदयास एक भास ही
अंधारल्या नभातील एक ती
नभही अंधार आता फेकुनी
चांदणी ही जाते परतुनी
स्वप्न हे राहते स्वप्नही
वचन हे मागते आज कुणी
पुन्हा भेटावी ती चांदणी
आठवणीतल्या घरातही!!”

✍️ योगेश

Leave a Reply