एकदा

“बघ एकदा माझ्याकडे
तो मीच आहे
तुझ्या पासुन दुर तो
आज ही तुझाच आहे

तु विसरली अशील ते
मी तिथेच जगत आहे
भुतकाळाचा अर्थ काय
माझं सगळं तिथेच आहे

क्षणात तुटल हे नातं
आजही मी जोडतं आहे
विखुरलेल्या आठवणीत
तुला मी शोधत आहे

तु येणार नाहीस
मला हे माहीत आहे
तरी हट्टी मनाला
तुझी साथ हवी आहे

बघ एकदा मागे वळून
मी तिथेच आहे
साद देत तुला मी
एकटाच उभा आहे!”

✍️ योगेश

Leave a Reply