विरह

“आठवणीत झुरताना
कधी तरी मला सांगशील
डोळ्यात माझ्या पहाताना
कधी तरी ओठांवर आणशील

रोज सायंकाळी त्या वाटेवर
वाट माझी पहाशील
मंद दिव्यात रात्री
चित्र माझे रेखाटशील

मनात मला साठवुन
स्वप्नात माझी होशील
विरहात माझ्या रहाताना
अश्रु सोबत बोलशील

सांग ना एकदा
ते चित्र पुर्ण करशील
माझ्या प्रेमाला तुझ्या
शब्दांचा होकार देशील!!”

✍️ योगेश

Leave a Reply