मनातील वादळ

“वादळाने बोलावं एकदा
त्या उद्वस्त घराशी
मोडुन पडलेल्या
त्या मोडक्या छपराशी

ती वेदना कळावी
एक जखम मनाशी
का बनविले ते घर
ही भिंत काळजाची

जोपासली ती नाती
तुटावी फांदी जशी
कोसळले ते वृंदावन
आपल्याच कोणापाशी

काय राहिले जे गमावले
हा हिशोब स्वतःशी
तुला लागलं तर नाही ना रे?
हा प्रश्न वादळाशी… “

✍️ योगेश

Leave a Reply