एक तु

“एक आभास मनाला
तु पुन्हा मझ दिसताना
पाहुनही मझ न पहाताना ..एक तु!!

तुझ पापण्यात भरताना
नजरेतूनी पहाताना
पुन्हा का हवीशी.. एक तु!!

राहून आठवणींत
एक जागा ह्रदयात
अश्रुतही दिसताना .. एक तु!!

तु शब्द की निशब्द
सत्य की एक स्वप्न
अबोल या कवितेत .. एक तु!!”

✍️ योगेश

One comment

 1. तु ओळखुनही
  न ओळखलेली
  पाहुनही न पाहलेली
  एक ती….

  तुझी असुनही तु
  नाकरलेली
  एक ती…

  तुझ्या आसवातुनी
  झर्यासम वाहणारी
  एक ती…

  स्वप्न नव्हे ती सत्यात
  तुझ्या ही नखळत
  तुझीच झालेली
  एक ती…

  तुझ्याविना अधुरी नि एकटी
  प्रवास करणारी
  एक ती….

  तु येनार नाहीस माहीत असुनही
  आशेचा दिवा तेवत ठेवणारी
  मजबुर पण कमजोर नाही ती…

  …. i just tried to write another side of dis poem….

Leave a Reply