Skip to main content

चांदण्यात फिरताना

“चांदण्यात फिरताना
दुख मनात सलते
शुभ्र या चंद्रावरती
डाग लागले कसले
कुणी केला आघात
कोणते दुर्दैव असते
जीवन हे जगताना
घात लागले कसले
सुख शुभ्र धवल
दुखाचे काजळ असते
डोळ्यात घालुन त्यास
सौदर्य खुलत असते
आयुष्य हे असच
जगायचे असते
चंद्राचे डाग विसरुन
शुभ्र चमकायचे असते
दुखाची सल विसरुन
आनंदी जगायचे असते!!”

✍️ योगेश

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply