Skip to main content

कळत नकळत. ..

“कळत नकळत कधी
प्रेम मी केल होतं
तुला सांगावंस वाटलं
पण मनातच राहिल होत

चांदण्या मधील एक तु
खुप मी शोधलं होतं
चंद्रामागे शोधायचं
शेवटी मात्र राहिलं होतं

मनात तु असताना
सगळीकडे पाहिलं होतं
पाहूनही न दिसता
पापण्या मध्ये राहिलं होतं

शब्दांत तुला लिहिताना
कवितेत गायलं होतं
सुरात सूर मिसळत
भावनेत राहिलं होतं

आजही तुझंच हे मन
प्रेम फक्त राहिलं होतं
तुला सांगावंस वाटलं
पण मनातच राहिलं होतं!!”

✍️ योगेश

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply