प्रेम

“सतत तिच्या विचारात राहणं
तिच्या साठी चार ओळी लिहणं
लिहुनही ते तिलाच न कळनं
यालाच प्रेम म्हणतात का?

न राहुनही तिला बघावं
डोळ्यात मग साठवावं
अश्रु मध्ये दिसावं
यालाच प्रेम म्हणतात का?

रोजच्या वाटेकडे पहावं
ति येईल हे कळावं
पाहुनही न पहावं
यालाच प्रेम म्हणतात का?

तिने सहज निघुन जावं
हळुच मागे वळून पहावं
मग मंद हसावं
यालाच प्रेम म्हणतात का?

मग दिसेनासं व्हावं
हे प्रेम ह्रदयात रहावं
आठवणींत जगावं
यालाच प्रेम म्हणतात का?”

✍️ योगेश

Leave a Reply