आयुष्य

“आयुष्याचा हिशोब
काही केल्या जुळेना!
सुख दिल वाटुन
हाती काही उरेना!

दुखाच्या बाजारात
दाखल कोणी होईना!
गिर्‍हाईक मात्र त्याला
काही केल्या येईना!

कोण इथे कोणाचा
नाते काही कळेना!
पैसा इथे बोलतो
बाकी कोणी बोलेना!

क्षण किती जपणार
मन काही भरेना!
अश्रु हे ओघळताच
आठवण काही जाईना!

शेवट हे मरण
पाठ काही सोडेना!
जाता जाता ही अखेर
हिशोब काही जुळेना ..!!

✍️ योगेश

Leave a Reply