Skip to main content

मी एक क्षण

“मनात माझ्या
विचारात तु!!
हे प्रेम सखे मझ
आठवणीत तु!!

क्षण हे जगावे
सोबतीस तु!!
नकोच चिंता
मोकळ्या मनात तु!!

एक सांज वेळ
गाण्यात तु!!
नजरेत मी भरावे
आनंदी क्षण तु!!

एक शब्द मी
कवितेत तु!!
भावना मनातील
लाजनेही तु!!

मी एक आभास
जाणीव तु!!
दाटले हे आभाळ
पाऊस तु!!

मोकळे हे आकाश
आसरा एक तु!!
मी एक क्षण
जीवन हे तु … !!”

-योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply