Skip to main content

बाबा

“बाबा मनातल थोडं
आज सांगायचं आहे!!
बस जरा थोडा वेळ
तुझ्याशी बोलायच आहे!!

किती कष्ट करशील
हा संसार चालवशील!!
माझ्या सुखासाठी का
दिनरात राबशील!!

दोन घटका स्वतःसाठी
कधी न राहशील!!
माझ्या स्वप्नांना
तुझ्या डोळ्यांत पाहशील!!

काटकसर करून
मला भरपूर देशील!!
स्वतः साठी मात्र
काही न घेशील!!

रात्री उशिरा घरी
सकाळी लवकर जाशील!!
आपली भेट न होताच
दिवस असेच जातील!!

बाबा तुझ्या कष्टाचे
स्वप्न पुर्ण होतील!!
मी जे घडलो
घडविणारा तु होशील!!

बस जरा बाबा
थोड बोलायचं आहे!!”

-योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply