जीवन

“माहितेय मला जीवना
अंती सर्व इथेच राही
मोकळा हात अखेर
मोकळाच राही
जीवन तुझे नाव ते
संपूर्ण होऊनी
अखेर शुन्य राही

जीवन आता बोलते
हळुच ओठात हसते
पुन्हा काय बोलते
ऐक तु मानवा!!

अंत फक्त तुझाच होई
विचार मात्र तुझेच राही
कमाव असे विचार जे
अंती फक्त तुझेच राही!!”

– योगेश खजानदार

Leave a Reply