Skip to main content

तुझी आणि माझी मैत्री

“तुझी आणि माझी मैत्री
समुद्रातील लाट जणु
प्रत्येक क्षण जगताना
आनंदाने उसळणारी

तुझी आणि माझी मैत्री
ऊन्ह आणि सावली जणु
सतत सोबत असताना
साथ न सोडणारी

तुझी आणि माझी मैत्री
मन आणि भावना जणु
मी न बोलताही
सगळे समजुन घेणारी

तुझी आणि माझी मैत्री
गीत आणि सुर जणु
मधुर शब्दांच्या साथीने
जीवन सुंदर करणारी!!”

– योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply