प्रेम आणि तु

“प्रेम केलं तरी राग येतो
नाही केलं तरी राग येतो
तुच सांग प्रेम आहे की नाही!!

पाहील तरी राग येतो
नाही पाहिल म्हणून राग येतो
खर सांग चोरुन पाहतेस की नाही!!

मी नाही भेटलो म्हणुन चिडतेस
ऊशीर झाला म्हणून चिडतेस
मी येण्याची वाट पाहतेस की नाही!!

सारख माझ्यावर चिडतेस
हळुच माझ्या जवळ येतेस
माझ्या विरहात रडतेस की नाही!!

प्रेम आहे लपवतेस
डोळ्यात तुझ्या हे दिसते
सांग खरंच प्रेम आहे की नाही!!”

– योगेश खजानदार

Leave a Reply