शब्द व्हावे बोलके

“ओठांवरच्या शब्दांना
मार्ग हवे मोकळे
तु आहेस जवळ पण,
शब्द व्हावे बोलके

हे प्रेम नी भावना
नकळत जे घडते
अबोल त्या बंधनात
शब्द व्हावे बोलके

होकार तुझा मझ
नजरेतूनी दिसते
इशारे हे आपुले
शब्दा विना बोलके

ओठांवरच्या शब्दांना
मार्ग हवे मोकळे!!”

-योगेश खजानदार

Leave a Reply