दिवस माझे नी तुझे

“दिवस माझे नी तुझे
गोड त्या स्वप्नातले
चांदण्या रात्रीचे क्षण
परतुन आज यावे

सखे सोबत तुझी
अंधारल्या त्या रात्री
लागी मनाला ओढ
आज मिठीत यावे

हे प्रेम की वेदना
मना काही समजेना
तुझ्या त्या ओढीने
वाट कीती पहावे

लगबग ही मनाची
वाट त्या येण्याची
दुरून हा इशारा
प्रेम करूनी पहावे. ..!!”

-योगेश खजानदार

Leave a Reply