घर

घर म्हणजे सर्वस्व. नातं , प्रेम , आपुलकी , आदर सर्व काही म्हणजे घरचं.  नात्यांना जोडते ते प्रेम पण स्वार्थसाठी केलेल नातं कधीच टिकत नाही. ..

“एक होत छान घर
चार भिंती चार माणस
अंगणातल्या ओट्यावर
प्रेम आणि आपली माणसं
दुरवर पाहीला स्वार्थ
हसत आला घरात
प्रत्येकाच्या मनात
अंगणातल्या ओट्यावर
दिसत नाहीत आता
प्रेम आणि आपली माणसं
घर आता बोलु लागले
आपली माणसे शोधु लागले
नात्यांना ही सांगु लागले
घर आता घर न राहिले
उरल्या फक्त चार भिंती…!!”

– योगेश खजानदार

जिथं स्वार्थ येतो तिथं नातं टिकत नाही . त्यामुळे जीवनात प्रेम आणि स्वार्थ एकत्र कधी येऊ द्यायचा नाही.

Leave a Reply