मनाचा अंत

विचारांची जेव्हा सीमा शोधता येत नाही. अशावेळी मनात का चालू आहे. तेच कळत नाही. ..

“साथ न कोणी
एकटाच मी
विचारांचा शोध
मनाचा तो अंत

प्रवास एकांती
वाट कोणाची
बाकी दिसे का
मनाचा तो अंत

प्रश्न असे का
भिती कोणाची
दुरून वाटे
मनाचा तो अंत

लागी जिवाला
घोर निराशा
फसवे दिसे का
मनाचा तो अंत!!”

– योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply