Skip to main content

स्त्री

आज जागतिक महिला दिन. स्त्री म्हणजे देवाची सुंदर रचना. प्रेम , ताकद , कर्तव्य,  आई , पत्नी अशी कितीतरी गोष्टी ज्या म्हटलं की स्त्री आठवते.. खरंच स्त्री तुझ्या ताकदीस सलाम .. जगातील प्रत्येक स्त्रीला माझी ही कविता …

“जब जहा दुनिया बेबस
ताकद बनकर तु खडी
स्त्री तेरी शक्ती अपार
संहार करने तु खडी

माता तु जननी है तु
प्यार की मुरत खडी
प्रेम का सागर है तु
दुनिया में ना दुजा कोई

दुनिया अधुरी जहाँ
संपुर्ण बनके तु वही
प्यार तु नफरत भी तु
दुनिया की ताकद तुही

स्त्री तेरी शक्ती अपार
संहार करने तु खडी!!”

– योगेश खजानदार

        माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझी आई. खास आज महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या या चार ओळी खास तुझ्यासाठी आई ...

आईबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे.  अस म्हणतात देवाचं दुसरं रुप म्हणजे आई … आई फक्त तुझ्याचसाठी ….

“आई, खरचं तुझी मला आठवण येते

तु भरवलेल्या घासाची
तुझ्या प्रेमळ शब्दाची
तु गोंजारलेल्या हातांची,
आई, खरचं आठवण येते.

तु कधी रुसत होती
तु कधी रागवत होतीस
तुझ्या त्या प्रेमाची
आई, खरचं आठवण येते.

तुच घडवले मला
तुझेच हे संस्कार
यशाच्या शिखरावरही
आई, खरचं तुझी आठवण येते.

तुझी माया खरंच कळत नाही
तुझे रागावणे आणि प्रेम
यातला फरकंच कळत नाही
तुझ्या आठवणीने
क्षणोक्षणी येते भरुन मन
तुझ्या मायेचे
कधीच उपकार फेडु शकत नाही.

म्हणुनच आई, खरचं तुझी मला आठवण येते.
– योगेश खजानदार

           स्त्री म्हणजे देवाची सर्वात सुंदर रचना तिने सतत फुलले पाहिजे ….

जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खुप खुप शुभेच्छा !

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply