आठवण

प्रेम म्हटलं की ओढ असते ,तो दुरावा अगदी असह्य होऊन जातो. प्रेमावर ही मला सुचलेली छोटी कविता .. पहा तुमच्याही आठवणी जाग्या होतील …

“धुंध त्या सांजवेळी
मन सैरभैर फिरत
आठवणींना वाट मिळे
डोळ्यात दिसत
तु आहेस ही जाणीव
तु नाहीस हा भास
मनही हल्ली गंमत करत
तु येशील म्हणून
वाट पाहत असत
माझच हे मन
नाव तुझच असत
सांग या वेड्या मना
जगन असच असत
ओढ आयुष्यभराची
प्रेम दोन क्षणांच असत

धुंध त्या सांजवेळी
मन सैरभैर फिरत!!”

-योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply