Skip to main content

जय शिवराय !!!

“एक होता राजा
माझा जाणता राजा
शिवाजी तेचे ऐसे नाव

स्वराज्याचा ध्यास तो
आमचा इतिहास तो
क्षण क्षण ही आज बोलती
जय जिजाऊ जय शिवराय।।

आजही मराठी मनात
इतिहासाची साद ती
साक्षीलाही गडकिल्ले बोलती
जय जिजाऊ जय शिवराय।।

पुन्हा यावे राजे तुम्ही
मावळ्यांना आस ही
महाराष्ट्राची एकच साद
जय जिजाऊ जय शिवराय।।”

– योगेश खजानदार।।


शिवाजी महाराजा बद्दल मला प्रचंड आदर वाटतो. इतिहास वाचताना मला वाटत  खरंच  मी शिवरायांच्या काळात जन्माला आलो असतो तर मला राजांचा एक मावळा बनता  आले असते तो क्षण अनुभवता आला असता पण मी या मातीत जन्माला आलो हेच माझे भाग्य ….
जय शिवराय

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply