माझी बार्शी

नमस्कार बार्शीकरांनो ,
कसे आहात सगळे??

“लक्ष्मी राहते जिथे
भगवंत ज्याचा राजा
बार्शीचा थाट पहावा
जसा शिवराय माझा !!”


अशा आमच्या बार्शीचे मजेतच असणार हे
नक्कीच. पर्वा अचानक
जुन्या आठवणींना उजाळा मिळावा तशी माझी रोजनिशी मधील
बार्शी डोळ्यासमोर आली.
त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तो माझी बार्शी ही कविता वाचून.
त्यातील काही आळी सर्वांन सोबत share
कराव्या वाटल्या म्हणून हे सर्व ……


“हो मित्रा, मी बार्शीचा
आहे ती भगवंताची
माझ्या अंबरीष राजाची
माझ्या आठवणींच्या क्षणांची,
वाढलो इथेच घडलो इथेच
संस्कार माझे बार्शीचे
आदर्श आमचे कर्मवीर
विचार आमचे ज्ञानाचे.
आवाज आमचा मोठा
पण शब्द आमचे मऊ
यारों की यारी
इथेच खरी पाहु.
प्रेमळ आमचे मन
आम्ही जिवाला जीव लावु
काहीही झालं मित्रा
तरी आम्ही बार्शीचेच राहु …
तर मग गर्वाने
सांगा मी बार्शीचा आणि बार्शी माझी!!”

-योगेश खजानदार

Leave a Reply