Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » कथा

स्वप्न || कथा भाग २ || MARATHI STORIES ||

स्वप्न || कथा भाग २ || MARATHI STORIES ||

भाग २

“काय म्हणता मंदा देवी ??” आप्पा मंदाकडे हसत हसत म्हणाले.
“देवी काय हो !!”
“नाही ,मगाशी आपलं वेगळंच रूप पाहिलं !! म्हणून वाटलं मला!! “आप्पा खुर्चीवरून उठंत म्हणाले.
“पोराची काळजी वाटली म्हणून बोलले !! “
“सुनीलची ती काळजी काय करायची मंदा !! आपला पोरगा हुशार आहे!!”
“दिसत तर नाही कुठे !! नुसते फिरण्यात वेळ वाया घालत असतो !! ” मंदा आप्पांकडे पहात म्हणाली.
“नाही ग मंदा !! आपलं पोर अस करणार नाही बघ !! मध्यंतरी फुलेंच पुस्तकं वाचताना पाहिलं त्याला !! टीळकांचे पण विचार बोलत होता मध्ये !! डोळ्यात नुसते तेज !!” आप्पा हातात लिहिलेला कागद पाहात म्हणाले.
“त्यांनी पोट थोडंच भरणार आहे?? मला त्याच्या भविष्याची काळजी वाटते !! ” मंदा.
“करेल ग नक्की काहीतरी करेन आपलं पोर !! बरं चला झोपा आता, लवकर उठायचं ना उद्या !! ” मंदा आप्पांकडे होकारार्थी मान हलवत बघत होती.

पाहता पहात किरणाची एक माळ पूर्वेकडून आली आणि साऱ्या आसमंतात भरून गेली. सुनील सकाळची न्याहारी आटोपून बाहेर जाण्याच्या तयारीत होता. मंदा त्याची लगबग पाहात होती.
“आज कुठे मग ?? आणि ती सोबतीन आली नाही ती अजून ??” मंदा अगदी जोरात म्हणाली.
“आई सोबतीन काय !! मैत्रीण आहे माझी ती !!” सुनील हतातली पिशवी आवरतं बोलत होता.
“वागते तर तशीच !!! ” तेवढ्यात दरवाज्यातून कोणीतरी येत आहे अस मंदाला वाटलं, आणि ती म्हणाली.
” या आपलीच कमी होती !!”
“काकू सुनील ???” सुनीलची खास मैत्रीण आणि त्याची सोबतीन उमा मंदाकडे पाहत म्हणाली.
“हे काय आवरतच आहे तो ..!! “मंदा सुनीलकडे हात करत म्हणाली.

सूनीलची खास मैत्रीण म्हणजे उमा. आता हे दोघे बाहेर काय करतात ते मंदाला सांगूनही कधी कळलं नाही. त्यामुळे त्याचे कित्येक अर्थ काढून ती मोकळी होत असे.

“आई !! आज यायला थोडा उशीर होईल बर !!” अस म्हणत सुनील बाहेर निघून गेला.
उमा आणि सुनील त्यांच्या रोजच्या जनजागृतीच्या कामास लागले.
“आज कुठे पथनाट्य घ्यायचं म्हटलीस तू उमा??”
“अरे शेजारच्या गावातील बोरुवस्ती म्हणून आहे तिथे !!” उमा सुनीलकडे पाहात होती.
“चला मग !! आणि आपले मित्र कुठे आहेत ?? “
“पोहचले असतील कधीच तिथे !! “उमा आणि सुनील बोरुवस्तीत जाऊ लागले.
सुनील काहीतरी वेगळं करेन या आप्पांच्या वाक्यात कुठे तरी स्वानुभव होता हे नक्कीच. उमा आणि सुनील तिथे पोहचताच त्यांनी वस्तीतल्या लोकांसमोर पथनाट्य सुरू केले. काहीतरी वेगळं आहे की काय अशा नजरेत सारे बघत होते. सुनील आणि उमाचा खणखणीत आवाज साऱ्या वस्तीत फिरत होता.
“अरे यारे !! अरे यारे !! अरे यारे !! यारे यारे यारे!!” सुनील मोठ्याने म्हणाला. आजूबाजूला लोक जमा झाले.
“आहो ताई !! आक्‍का !! काका !! आणि तात्या !! यारे यारे !!! ” उमा म्हणाली.
“सांगतो एक गोष्ट
तुम्ही लक्ष देऊन ऐका
पोरीस द्या शिक्षण
आणि शान वाढवा बरका!! “
अरे यारे !! अरे यारे !! आमचं काही ऐका रे !!!
घराचा दिवा पोरगं जणू
घराची वात पोरगी असते
घरात सारे शिकले तर
घराची प्रगती होत असते
अरे यारे !! अरे यारे अरे यारे !! ” सुनील आणि त्याचे सोबती सगळे मिळून म्हणू लागले .
तेवढ्यात गर्दीतून कोणी एकाने सुनीलच्या दिशेने दगड भिरकावला. सुनीलच्या तो डोक्यावर लागला. रक्त आले. कोणी तो एक गर्दीतून म्हणाला.
“निघा रे इथुन लवकर !! तुमची मती बुडाली पण आमची नका बुडवू !! पोरीच शिक्षण म्हणजे!! धर्म बुडाला म्हणजे !! हाकला रे यांना !! ” गर्दी आक्रमक झाली.

सुनील अचानक डोक्याचे रक्त पुसत उभारला.

“अरे धर्म शिक्षणाने बुडत नाही !! आणि मुलगी तर दोन घरांची वात !! जाईल तिथे उजेड करेन !!”
“ये तू आम्हाला नको शिकवू रे !! ” अस म्हणत सुनील, उमा आणि त्यांच्या मित्रांना वस्तीतून बाहेर काढलं.

घरी येताच मंदाने सारा प्रकार पाहिला. आणि ती रागाने लालबुंद झाली. कित्येक वेळ ती सुनील आणि उमाला बोलत होती. डोक्यावर मलमपट्टी करून सुनील घरी आला आणि मंदा चिडली. तो राग आईच्या मायेचा होता हे सुनीलला कळायला वेळ लागला नाही. रात्री जेवताना आप्पांना सगळी कहाणी सांगून सुनील आप्पांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होता.

“स्त्री ही खूप मोठी शक्ती !! आणि ती शिकली तर समाज अजून पुढे जाईन !! सुनील तुझ्या या कार्याला खरंच खूप सलाम !! बदल घडेल!! नक्की घडेल !! फक्त तो बदल करण्याची ताकद कमी पडता कामा नये !! ” आप्पा सुनीलच्या डोळ्यात पाहात म्हणाले.

“आप्पा !! खरंच तुमच्या या विचारांनी मला अजुन प्रेरित केले !! “
सुनील आणि आप्पा कित्येक वेळ बोलत बसले. रात्री बोलून झाल्यावर आप्पा आपल्या खोलीत आले. लेखणी हातात घेत लिहू लागले.

” कधी कधी आपण आपल्याच बालपणास , तारुण्यास!! आपल्या मुलात पुन्हा पुन्हा अनुभवत असतो. सुनीलच्या रूपाने मला माझे कित्येक जुने क्षण पुन्हा पुन्हा अनुभवता आले. पण त्याच्या जन्मानंतर आठ दिवस स्वातंत्र्यासाठी कोठडीत राहावं लागलं होत हे आज खुप आठवतं. गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला आणि त्याची आवृत्त्ती आम्ही इकडे आमच्या गावात केली. दादांना काहीही न सांगता मी सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभागी झालो. पोलिसांनी त्या नंतर आठ दिवस आम्हाला कित्येक अत्याचाराणी त्रस्त केले. आम्ही मात्र एक पाऊलही मागे झालो नाही. पुन्हा नंतर सोडले तेव्हा दादांची प्रतिक्रिया बाकी मोलाची होती.

“सदा माझ्या पोरा !! देशासाठी झटतो आहेस पाहून मनाला आनंद झाला..!! अरे ते टिळक ,बापू म्ह्णजे या स्वातंत्र्य संग्रामाचे अग्निकुंड रे !! पोरा अभिमान वाटतो तुझा !!!” अगदी मनसोक्त दादा बोलले.

आप्पा हातातली लेखणी खाली ठेवत खोलीतल्या दिव्याकडे एकटक पहात राहिले, कित्येक वेळ.

क्रमशः

स्वप्न || कथा भाग १ ||
स्वप्न || कथा भाग ३ ||

Yogesh Khajandar

Author || Content Writer || Blogger ||

SHARE

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter
  • Tumblr
  • Pinterest
गोष्टी गावाकडच्या मराठी कथा रोचक कथा स्वप्न!!‌(कथा भाग २)

READ MORE

बंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||
बंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||
बंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||
बंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||
बंगला नंबर २२ || कथा भाग ६ || सत्य || Marathi Horror Story ||
बंगला नंबर २२ || कथा भाग ६ || सत्य || Marathi Horror Story ||
बंगला नंबर २२ || कथा भाग ५ || वासना || मराठी कथा ||
बंगला नंबर २२ || कथा भाग ५ || वासना || मराठी कथा ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POEMS

asian couple holding hands in yard

मिठीत माझ्या || MITHIT MAJHYA ||

आज शब्दांतुन तिला आठवतांना ती समोरच असते माझ्या कधी विरहात तर कधी प्रेमात रोजच सोबत असते माझ्या बरंच काही लिहिताना कधी अश्रु मध्ये असते माझ्या कधी कवितेतल्या प्रत्येक ओळीत तर कधी भावनेत असते माझ्या
man and woman boat rowing in sea during golden hour

राहून गेले काही || MARATHI LOVE POEMS ||

राहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत
blackboard with your life matters inscription on black background

सुख || SUKH || MARATHI KAVITA ||

चुकलेले मत हताश बळ लाचार जीवन पुन्हा ती वाट नाही!! शब्दाची कटुता तिरस्कार असता मनातील भावना प्रेम दिसत नाही!!
bird s eye view photography of road in the middle of desert

स्वतः स शोधताना || Women’s Day ||

माझ्यातल्या "मी" ला शोधायचं आहे मला मी एक स्त्री आहे खूप बोलायचं आहे मला मी जननी आहे मी मुलगी आहे तरी स्वत:ला पहायचं आहे मला

TOP STORIES

senior ethnic man in headscarf in nature

शर्यत (कथा भाग ४ ) || Sharyat katha bhag 4 ||

"भूक लागली असलं ना ??" सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला. शांता पाणी घटाघटा प्याली. "पोटात भुकेन कावळे वरडायलेत !!" शांता पाण्याचा तांब्या खाली ठेवत म्हणाली. "चल मग जेवूयात !! " सखा तिला उठवत म्हणाला. "जेवण ??" सखा फक्त तिच्याकडे पाहून हसला. "तुम्ही केलंत ??" "हो !! "
crop couple holding hands on balcony in evening

दोन श्वास || A Short MARATHI Heart Touching Story ||

मी राखुन ठेवले होते एक श्वास तुला पहायला एक श्वास तुला बोलायला मनातल काही सांगायला तुझ्या मनातल ऐकायला तुझा हात हाती घ्यायला
man sitting on wheelchair

बंधन || कथा भाग २ || LOVE STORY || MARATHI ||

सकाळच्या किरणांनी विशाल प्रितीच्या आठवणींन पासुन दुरावला. त्या उगवत्या सूर्याला त्याला म्हणावंसं वाटतं कधी कधी. " उगाच येतोस तु उगवून पुन्हा , आणि मला माझ्या उरलेल्या क्षणांची जाणीव करून देतोस!!" विशाल पलंगावर पडून खिडकीतून येणाऱ्या सुर्यकिरणांशी जणू बोलत होता.
mysterious shadow behind dark backdrop

विरोध || कथा भाग ४ || MARATHI PREM KATHA ||

"अनिकेत एक विचारू ??" अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणतो. "विचारतेस काय !! बोल ना !!" "आज सकाळ पासून पाहतेय मी !! तुझा मूड मला काही ठीक वाटत नाहीये !! काही प्रोब्लेम तर नाहीना ??" अनिकेत क्षणभर शांत बसतो आणि बोलतो. "नाही ग !! काही प्रोब्लेम नाही!!" "मग असा गप्प गप्प का आहेस ?"

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest