Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » मराठी लेख

मी आणि माझी आई . || AAI MARATHI ESSAY ||

मी आणि माझी आई . || AAI MARATHI ESSAY ||

“बडबड करणारी आई क्षणभर जरी अबोल झाली तरी मुलाला नकोस होत. घरात आल्या आल्या नजरेत नाही दिसली तरी बैचेन होत. आईने आपल्याला चुकून जरी हाक मारुन नाही बोलावलं तरी मन आईला शोधत फिरत आणि या आईरुपी मायेच्या झाडाला अलगद येऊन बिलगत. आई नावाचं हे झाड किती जरी वठल तरी त्याची सावली हवीहवीशी वाटते ,त्या सावलीत बसून एकदा डोक्यावरती फिरलेला तिचा हात जणू मंद वाऱ्याची झुळूक वाटते, आणि त्या मायेच्या कुशीत साऱ्या जगाची किंमत शून्य वाटते. “
अगदी सहज सुचलेल्या काही ओळी आईला वाचून दाखवल्या आणि तिच्या डोळ्यात चटकन पाणी आल. ‘मी फक्त तुला प्रेम देत राहिले , पण त्या प्रेमाची सुंदर वाख्या तू केलीस हे पाहून खूप बरं वाटलं !!’ अस आई म्हणाली आणि स्वयंपाक घरात निघून गेली. थोड्या वेळाने जेवायला गेलो तेव्हा ताटात माझ्या आवडीच आम्रखंड होत. मी विचारलं, ‘ आई आज काय विशेष आम्रखंड केलंस ते??’ तर आई म्हणते कशी , ‘ असच केलं रे !! अगदी सहजच !! ‘ पण तिच्या गालातल्या त्या स्मितहास्याने मला सगळं काही सांगितलं. तिच्यासाठी लिहिलेल्या त्या चार ओळी तिला इतक्या आवडल्या की तिने त्याबद्दल मला आम्रखंड दिलं. अगदी मनसोक्त खाल्ल्यावर मी पुन्हा वाचत बसलो.

कित्येक वेळ पुस्तकाची पाने चाळत असताना अचानक थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग मनात घोळू लागला. मी चार ओळी आईसाठी लिहिल्या, अगदी सहजच. तर तिने मला लगेच माझ्या आवडीचे दिले. मग त्या आईने तर आपल्याला आजपर्यंत किती दिले आणि अजूनही देतच आहे. मग आपण त्या आईचे किती देणे लागतो. केला हिशोब . अगदी आठवून आठवून केला. आणि सहज तोंडातून शब्द निघाले ‘ आई!! तुझ्या प्रेमाचे ऋण फिटता फिटत नाही !! सारे आयुष्य खर्ची केले तरी तुझे प्रेम संपता संपत नाही!!’ पुढे काही शब्द पुसटसे ओठांवर येऊन परतून गेले. कारण खिडकीच्या बाहेर झाडावर एक चिमणी आपल्या पिलांना घास भरवत असताना दिसली. मी पुस्तक बाजूला ठेवले आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. क्षणभर हरवून गेलो त्या चिमण्यात. आपल्या चोचीत काहीतरी पकडून आणलं होत तिने आणि पिल आपल्या चोची उघड्या करून आकाशाकडे पाहत होती. चिवचिव करणारी ती पिले त्या घरट्यात खाऊन झाल्यावर आपल्या आईला बिलगुन बसली. कित्येक वेळ मी पहात राहिलो.

मनात असंख्य विचार माझ्या नेहमीच गोंधळ घालत असतात. पण त्या दिवशी ती चिमणी आणि तिची पिले एवढाच विचार माझ्या मनात घोळत होता. राहून राहून वाटायचं , मला बोलता येत , मला लिहिता येत ,मला व्यक्त करता येत म्हणून मी लिहिलेल्या चार ओळी आईला वाचून दाखवू शकलो. त्यामुळे माझे तोंडही गोड झाले . पण या मुक्या पक्षाचं , प्राण्याचं काय ?? ती पिल आपल्या आईला कोणत्या शब्दात सांगत असतील आपल्या भावना ?? कस सांगत असेल वासरू आईचं प्रेम ??? पण मनात विचार आला !! या प्रेमाला, या आई आणि पिलाच्या नात्याला!! खरंच शब्दांची गरज आहे ??नाही ना ?? मग कशी होतात व्यक्त हे मुकी जनावरे ?? असंख्य विचार , नुसते शब्द, शब्द आणि शब्द एवढंच असतं का प्रेम ?? तर नाही !! आपल्याला बोलता येत पण त्यांना नाही, पण तरीही ती पिले आईला आपलं प्रेम व्यक्त करतात. तिच्या पंखाच्या सावलीत ,वादळात तिच्यावर विश्वास ठेवतात. ती नक्की आपल्याला चिऊचा घास घेऊन येईल या आशेवर आपल्या आईची वाट पहात बसतात. खरंय मुके पक्षीही आपलं प्रेम आईला अगदी त्यांच्या भाषेत सांगतात. आपल्या मऊ स्पर्शाने सांगतात.

वेळ येताच आई आपली मार्गदर्शक होते. वेळ येताच आपण कुठे चुकलो तर आपल्याला योग्य सल्ला देते !! आपण कितीही वेळा पडलो तरी पुन्हा जिद्दीने उभ राहायला बळही देते !! आई आयुष्याचं सार्थक करते !! समोरच्या त्या घरट्यात ती चिमणी पिलांना आकाशात झेप कशी घ्यावी ते कदाचित शिकवत होती. मी मात्र त्यांच्या भावना माझ्या शब्दात समजून घेत होतो. कदाचित प्रत्येक आई आपल्या पिलाला , बाळाला?? मुलाला?? सगळे सारखेच !! नाही का ?? हेच सांगत असणार . शिकावं कस !! जगाव कस ! मग ते शब्दात असो की कृत्यातून !! माणूस असो की पक्षी, आई ही शेवटी आईचं असते. तीचं प्रेम कधीचं कमी होत नाही. आपल्या पिल्लांना शिकवताना कित्येक वेळा ती पिल्लं धडपडत होती , चिमणी पुन्हा पुन्हा त्या पिल्लाला सावरून घेत होती. आई !! आयुष्य कसे असावे ते सांगत होती !! अगदी मुक्याने ?? हो !!

माझ्या लक्षात येण्या अगोदर एक मस्त कॉफीचा कप माझ्या शेजारी खिडकीत ठेवला गेला. मी क्षणभर वळून पाहिले तर ती आई होती !! मला जाताना एवढंच म्हणून गेली ‘ थंड होण्या आधीच पिऊन घे !! ‘ मी काहीच बोललो नाही . माझं लक्ष बाहेरच त्या चिमण्या सोबत मुक्त संचार करत होत, ती धडपड पाहत होतं, आपल्याला शोधत होतं. आणि पाहता पाहता साऱ्या चिमण्या आकाशात भुर्र्रर करत उडाल्या. साऱ्या आसमंतात फिरून आल्या. जरा चिवचिवाट जास्तच करत होत्या घरट्यात आल्या तेव्हा. बहुतेक आयुष्याची पहिली झेप आनंदाने साजरी करत असतील. हो ना ?? एक पिल्लू आपल्या आईला बिलगुन बसलं होत. आपलं प्रेम तर व्यक्त नाहीना करत ते ?? कदाचित असेलही !! तो कॉफीचा कप अलगद उचलत मी घरात पाहू लागलो, पाठमोऱ्या आईकडे पाहत राहिलो , ती आपल्या कामात व्यस्त होती आणि माझ्या ओठातून नकळत ओळी बाहेर आल्या .

आई !! तुझ्या प्रेमाचे ऋण, फिटता फिटत नाहीत!!
सारे आयुष्य खर्ची केले तरी, तुझे प्रेम संपता संपत नाही !!
कधी नकळत सांगितले मी , कधी अबोल राहिलो मी !!
आई !! तुझे हे प्रेमरूप, शब्दात सांगता येत नाही !!

आई !! तुझे हे प्रेमरूप,शब्दात सांगता येत नाही !!

©✍️योगेश खजानदार

SHARE

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter
  • Tumblr
  • Pinterest
aai Marathi articles marathi lekh marathi story

READ MORE

वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग ११ || नवे वळण ||
वर्तुळ || कथा भाग ११ || नवे वळण ||
वर्तुळ || कथा भाग 1 || Marathi Katha ||
वर्तुळ || कथा भाग १ || मराठी कथा ||
child and woman standing near water
आई || कथा भाग ९ || Mother Daughter Story ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POEMS

asian couple holding hands in yard

मिठीत माझ्या || MITHIT MAJHYA ||

आज शब्दांतुन तिला आठवतांना ती समोरच असते माझ्या कधी विरहात तर कधी प्रेमात रोजच सोबत असते माझ्या बरंच काही लिहिताना कधी अश्रु मध्ये असते माझ्या कधी कवितेतल्या प्रत्येक ओळीत तर कधी भावनेत असते माझ्या
man and woman boat rowing in sea during golden hour

राहून गेले काही || MARATHI LOVE POEMS ||

राहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत
blackboard with your life matters inscription on black background

सुख || SUKH || MARATHI KAVITA ||

चुकलेले मत हताश बळ लाचार जीवन पुन्हा ती वाट नाही!! शब्दाची कटुता तिरस्कार असता मनातील भावना प्रेम दिसत नाही!!
bird s eye view photography of road in the middle of desert

स्वतः स शोधताना || Women’s Day ||

माझ्यातल्या "मी" ला शोधायचं आहे मला मी एक स्त्री आहे खूप बोलायचं आहे मला मी जननी आहे मी मुलगी आहे तरी स्वत:ला पहायचं आहे मला

TOP STORIES

senior ethnic man in headscarf in nature

शर्यत (कथा भाग ४ ) || Sharyat katha bhag 4 ||

"भूक लागली असलं ना ??" सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला. शांता पाणी घटाघटा प्याली. "पोटात भुकेन कावळे वरडायलेत !!" शांता पाण्याचा तांब्या खाली ठेवत म्हणाली. "चल मग जेवूयात !! " सखा तिला उठवत म्हणाला. "जेवण ??" सखा फक्त तिच्याकडे पाहून हसला. "तुम्ही केलंत ??" "हो !! "
crop couple holding hands on balcony in evening

दोन श्वास || A Short MARATHI Heart Touching Story ||

मी राखुन ठेवले होते एक श्वास तुला पहायला एक श्वास तुला बोलायला मनातल काही सांगायला तुझ्या मनातल ऐकायला तुझा हात हाती घ्यायला
man sitting on wheelchair

बंधन || कथा भाग २ || LOVE STORY || MARATHI ||

सकाळच्या किरणांनी विशाल प्रितीच्या आठवणींन पासुन दुरावला. त्या उगवत्या सूर्याला त्याला म्हणावंसं वाटतं कधी कधी. " उगाच येतोस तु उगवून पुन्हा , आणि मला माझ्या उरलेल्या क्षणांची जाणीव करून देतोस!!" विशाल पलंगावर पडून खिडकीतून येणाऱ्या सुर्यकिरणांशी जणू बोलत होता.
mysterious shadow behind dark backdrop

विरोध || कथा भाग ४ || MARATHI PREM KATHA ||

"अनिकेत एक विचारू ??" अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणतो. "विचारतेस काय !! बोल ना !!" "आज सकाळ पासून पाहतेय मी !! तुझा मूड मला काही ठीक वाटत नाहीये !! काही प्रोब्लेम तर नाहीना ??" अनिकेत क्षणभर शांत बसतो आणि बोलतो. "नाही ग !! काही प्रोब्लेम नाही!!" "मग असा गप्प गप्प का आहेस ?"

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest