"मातीचा कण नी कण बोलतो गाथा इथे पराक्रमाची!! शिवाजी महाराज आणि निडर शंभू राजांची!! वाऱ्यासवे घुमते आजही वाणी थोर महात्म्यांची !! संत तुकाराम आणि बोली ज्ञानोबा माऊलींची!! अखंड तेवत राहते ज्योत महापुरुषांच्या विचारांची!! टिळक,शाहू,फुले आणि कित्येक थोर व्यक्तींची!! पानाफुलात बहरते इथे संस्कृती मराठी माणसांची!! सांगते मराठी बाणा आणि ताकद या महाराष्ट्राची ..!!!" ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
