"हे धुंद सांज वारे
 बेधुंद आज वाहे
 सखे सोबतीस
 मनी हुरहुर का रे??

 मी बोलता अबोल
 शब्द तेही व्यर्थ
 समजुन हे इशारे
 लगबग तुझ ती का रे??

 मावळतीस सुर्य
 लालबुंद जरा तांबुस
 वाट पाहतो कुणी
 त्याला ही घाई का रे??

 नको मझ विरह
 तुझं ओढ परतीस
 वचन हे इथेच
 पुन्हा भेटशील का रे??"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

एक लाट. !! EK LAAT

अलगद स्पर्श करून जाणारी समुद्राची ती एक लाट प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी पाहात होती माझीच वाट…
Read More
Scroll Up