“हवंय मला ते मन
प्रत्येक वेळी मला शोधणार
माझ्या गोड शब्दांनी
लगेच माझं होणारं
मी शोधुनही न सापडता
बैचेन होणारं
आणि एकांतात बसून
माझ्यासाठी रडणारं!!


हवंय मला ते मन
मला समजुन घेणारं
माझ्या मनाशी
खुप काही बोलणारं
आयुष्यभर साथ देत
आनंदाने नाचणारं
आणि सुख दुःखात
माझ्या सोबत असणारं!!


हवंय मला ते मन
स्वतःस विसरणारं
माझ्या धुंद आठवणीत
स्वतःच रमणार
हळुवार स्पर्शाने
अलगद लाजणार
आणि माझ्या नकळत
खुप प्रेम करणारं!!

हवंय मला ते मनं 
प्रत्येक वेळी मला शोधणार…!!”

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा