हळूवार तू लाजता, लाजून दूर जाणे !! सखे मिठीत येण्या, नको कोणते बहाणे !! नजरेतूनी तू बोलता, शब्दाविन ते कळणे !! ओठांवरी ते हलके, सारे विरून जाणे !! हलके ते हात, हातात आज घेणे!! नकळत तो स्पर्श, मनास त्या बोलणे !! क्षणात या सहज, क्षण विरून जाणे !! तुझ बोलता नकळत, बहरून आज जाणे !! हरवली ती निशा, चांदण्यात आज शोधणे !! शोधूनही न सापडता, तुझ्यात ते गुंतणे!! का उगा मग , पुन्हा पुन्हा पाहणे !! पाहूनही तुझ का?? नजरेत त्या भरणे !! वेडी प्रीत ही, तुझ्यावरी का जडणे?? प्रेम किती मज, शब्दाविन ते कळणे !! ✍️ शून्य (योगेश खजानदार)