"अगदी रोजच भांडण व्हावं !!
 अस कधीच वाटलं नाही
 पण खूप दिवसांनी एकदा व्हावं
 अस मात्र उगाच वाटतं राहत !!

 थोडंसं रुसाव , फुगाव ,अबोल व्हावं
 अस नेहमीच वाटत नाही
 पण एकदा तरी क्षणिक रागवाव
 अस मनात सतत वाटतं राहत..!!

 त्याच्या विरहात, खूप दूर निघून जावं
 अस स्वप्नातही कधी पाहिलं नाही
 पण क्षणभर तरी दुरावा यावा
 अस सारखं मन बोलत राहत.!!!

 खूप काही त्याने मला बोलावं
 असं ठरवूनही त्याला सांगितलं नाही!!
 पण दोन शब्द प्रेमाचे बोलावे
 अस मात्र नेहमी वाटतं राहत!!

 क्षणोक्षणी त्याने जवळच असावं
 अस वचन कधीच मागितलं नाही!!
 पण हळव्या वेळी नकळत यावं
 अस त्याला सांगावं वाटत राहतं!!

 त्याने व्यक्त व्हावं , सारखं नजरेत असावं
 अस कधीच मला वाटल नाही!!
 पण एकदा तरी, मिठीत घट्ट पकडून ठेवावं
 अस नेहमी वाटतं राहतं ..!!"

 ✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*